फोनवरून तरुणीचे बॉयफ्रेंडसोबत भांडण, जुहु जेट्टीत आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत एका तरुणीने क्षुल्लक कारणावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने स्थानिक नागरिकांनी तिला वाचवले आहे.

मुंबईच्या जुहु जेट्टीवर शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास एक तरुणी आपल्या प्रियकरासोबत भांडत होती. फोनवरून दोघांचे भांडण झाले होते. यावेळी तरुणीची बहीणही उपस्थित होती. तरुणी सारखी पाण्यात जाऊन जीव देण्याची धमकी देत होती. नंतर तरुणीची बहीण आणि प्रियकर जेव्हा निघत होते तेव्हा तरुणी पाण्यात उतरली. सुदैवाने स्थानिक नागरिक निकी डिसुजा तिथे उपस्थित होत्या. त्यांनी तत्काळ तरुणीला बाहेर काढले. त्यानंतरही तरुणी आणि प्रियकर भांडतच होते, तेव्हा स्थानिक नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले आणि तरुणी आणि तिचा प्रियकर तिथून निघून गेले.