अमृताची नखरेल अदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री अमृता पत्की हिने ग्लॅमर विश्वात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 2006 च्या ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेपर्यंत यशस्वी ठरल्यानंतर अमृताने आंतरराष्ट्रीय पातळीवरही ‘मिस अर्थ एअर’चा किताब मिळवला. 2010 मध्ये तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर काही मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली. ही गुणी अभिनेत्री आता बऱयाच कालावधीनंतर ‘सूर्या’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

‘रापचिक रापचिक कोळीणबाई’ असे बोल असणाऱया गाण्यात अमृताचा नखरेल अंदाज दिसणार आहे. उमेश जाधव यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे, तर संतोष दरेकर, मंगेश ठाणगे, देव चौहान संगीतकार आहेत. ममता शर्मा आणि देव चौहान यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणं गायलं आहे. ‘हे आयटम साँग करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम साँग ठेका धरायला लावेल’ असा विश्वास अमृताने व्यक्त केला.