काचेचा की स्टीलचा? आॅफिसच्या टिफीनसाठी कोणता डबा उत्तम, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टिफिनसाठी कोणता डबा उत्तम – काचेचा की स्टीलचा – हा प्रश्न अनेकांना पडतो. दोन्ही प्रकारांचे काही फायदे आणि मर्यादा आहेत. स्टीलचा डबा पारंपरिक आणि जास्त वापरला जाणारा पर्याय आहे. स्टेनलेस स्टील मजबूत, टिकाऊ आणि तुटण्याचा धोका नसलेले असते. तो हलका असल्यामुळे शाळा किंवा ऑफिसला नेण्यासाठी सोयीचा ठरतो. स्टीलमध्ये अन्न सुरक्षित राहते आणि त्यावर रासायनिक प्रतिक्रिया होत नाही. तसेच तो स्वच्छ धुणे आणि दीर्घकाळ वापरणे सोपे असते.

फ्लाॅवरमधील किड काढण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायला हव्यात

काचेचा डबा आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित मानला जातो, कारण काचेमुळे अन्नाच्या चवीत बदल होत नाही आणि कोणतेही हानिकारक रसायन मिसळत नाही. मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्यासाठी काचेचा डबा सोयीचा असतो. मात्र तो जड आणि नाजूक असल्यामुळे पडल्यास फुटण्याची शक्यता असते.

दररोज सायकल चालवण्यामुळे आपल्या आरोग्यास कोणते फायदे होतात

दररोज शाळा किंवा प्रवासासाठी स्टीलचा डबा अधिक योग्य ठरतो, तर घरात किंवा ऑफिसमध्ये मायक्रोवेव्ह वापरणाऱ्यांसाठी काचेचा डबा चांगला पर्याय आहे. त्यामुळे वापराच्या गरजेनुसार योग्य डबा निवडणे अधिक महत्त्वाचे आहे.