Global Chess League Season 3 – सहा संघ आणि 26 खेळाडूंमध्ये रंगणार बुद्धिचा डाव; मुंबईत पार पडणार स्पर्धा

Global Chess League Season 3 चा थरार मुंबईत 13 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे. दुबई (2023), लंडन (2024) आणि आता मुंबईमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे. टेक महिंद्रा आणि FIDE यांच्या संयुक्त उपक्रमात या स्पर्धेच आयोजन केलं जाणार आहे. यासाठी शुक्रवारी (26 सप्टेंबर 2025) खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळाली. जगज्जेता डी गुकेश आणि अर्जुन एरिगायसी यांना पीबीजी अलास्कन नाईट्सने सुरक्षित करत दणक्यात सुरुवात केली, तर नवख्या वेल्सी सो ला आपल्या संघात घेण्यासाठी संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली, अखेर मुंबई मास्टर्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. तसेच पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथ आनंद गंगा ग्रँडमास्टर्स संघात सामिल झाला. विशेष म्हणजे Magnus Carlsen याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

संहा फ्रँचायझींनी आपले संघ तयार केले असून मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊस येथे स्पर्धा खेळली जाणार आहे. 12 दिवस चालणाऱ्या या सहा संघांच्या फ्रँचायझी लीगमध्ये डबल-राउंड-रॉबिन फॉरमॅट असेल, ज्यामध्ये प्रत्येक संघ दहा सामने खेळेल, ज्यामध्ये सहापैकी सर्वोत्तम बोर्ड सिस्टीमचा निर्णय घेतला जाईल. या वर्षी नवीन म्हणजे जीसीएल कंटेंडर्स 2025, हा एक जागतिक उपक्रम आहे. जो इच्छुक खेळाडूंना जीसीएल ड्राफ्टमध्ये थेट प्रवेश देतो. सहा टाइम झोनमधील तीन विजेत्यांना जगातील पहिल्या फ्रँचायझी आधारित बुद्धिबळ लीगमध्ये ग्रँडमास्टर्ससोबत खेळण्याची आयुष्यात एकदाच संधी मिळणार आहे.

सहा संघ आणि त्यांचे खेळाडू

मुंबई मास्टर्स : वेस्ली सो, कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली, मॅक्सिम वाचियर-लाग्राव्ह, शख्रीयार मामेद्यारोव्ह

अल्पाईन एसजी पायपर्स : फॅबियानो कारुआना, प्रज्ञानंद, अनिश गिरी, होऊ यिफान, निनो बॅट्सियाशविली

गंगा ग्रँडमास्टर्स : विश्वनाथन आनंद, व्हिन्सेंट कैमर, रौनक साधवानी

अमेरिकन गॅम्बिट्स : हिकारू नाकामुरा, रिचर्ड रापोर्ट, बिबिसारा असाऊबायेव्हा, वोलोडार मुर्झिन

पीबीजी अलास्कन नाईट्स : डी गुकेश, अर्जुन एरिगायसी, लीनियर डॉमिंग्वेझ, कतेरीना लाग्नो, सारा खादेम

त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स : अलीरेझा फिरौजा, विदित गुजराथी, झू जिनेर, अलेक्झांद्रा कोस्टेनिउक