बार सुरू न करण्यामागचे कारण काय ? ‘आप’ नेत्यांचा भाजप सरकारला प्रश्न

1080
liquor Liqueur
प्रतिकात्मक फोटो

8 जून पासून गोव्यातील रेस्टॉरंट्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी देत असताना राज्यातली बार मात्र खुले करण्यास परवानगी अजून दिलेली नाहीये. रेस्टॉरंट्स खुली करून आणि बारला परवानगी नाकारून कोविडला दूर ठेवण्याचा हेतू कसा साधला जाईल हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने सरकारकडे केली आहे.

‘आप’चे गोवा सरचिटणीस प्रदीप पाडगांवकर म्हणाले की बारच्या व्यवसायावर लॉकडाऊनमुळे परिणाम झाला आहे. सरकारने आधीच दारू विक्रीची दुकाने सुरू केली होती, त्यापाठोपाठ आता रेस्टॉरंट्सही सुरू करण्यास परवानगी दिली. असं करत असताना गोवा सरकारने बारला का वगळलं असावं याच्यामागचा तर्क आपल्याला कळत नसल्याचं पाडगांवकर यांनी म्हटलं आहे.

बार आणि ताव्हॅर्न हे गोव्यातील पारंपारिक व्यवसाय आहेत. घाऊक दुकानातून दारू विक्रीस परवानगी देण्याचा सरकारचा निर्णय आणि आता रेस्टॉरंट्स उघडण्यास परवानगी देणे हा बार मालक तसेच बार ग्राहकांवरही अन्याय आहे असं आपच्या नेत्यांनी म्हटले आहे. बार बंद ठेवण्यास समर्थन करणारा काही अभ्यास सरकारने केला आहे का? की नेहमीप्रमाणे हे राज्य सरकार केंद्राचे प्यादे असल्याने एसओपीची वाट पहात आहे? ” असा प्रश्नही या नेत्यांनी विचारला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या