
गोव्यामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून ज्या मतदारसंघाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं त्या पणजी मतदारसंघात भाजपचे बाबूश मोन्सेरात हे आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे. देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर हे या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते. उत्पल पर्रीकर हे दुसऱ्या क्रमांकावर असून मोन्सेरात आणि पर्रीकर यांच्यात तुल्यबळ लढत पाहायला मिळाली. शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत बाबूश मोन्सेरात यांना 4397 मते मिळाली होती तर पर्रीकर यांना 3693 मते मिळाली होती.
View this post on Instagram
गोव्यामध्ये एकूण 40 जागांसाठी मतदान झालं होतं. या सर्व जागांचे कल स्पष्ट झाले आहेत. कलांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाहीये. गोव्यात भाजपचे सर्वाधिक म्हणजे 18 उमेदवार आघाडीवर आहेत. त्याखालोखाल काँग्रेसचे 12 उमेदवार आघाडीवर आहेत. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे 5 उमेदवार आघाडीवर असून आप आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रत्येकी 1-1 उमेदवार आघाडीवर आहेत.3 अपक्ष उमेदवारही आघाडीवर आहेत.

























































