
एकीकडे कोविडमुळे राज्यात लॉकडाऊन असताना दुसरीकडे मात्र बिनधास्त रेव्ह पार्टी सुरू होती. या दम मारो दम पार्टीचे बॉलीवूड आणि भाजप कनेक्शन उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पार्टीचा आयोजक अभिनेता कपिल झवेरी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सांस्पृतिक कार्य मंत्री गोविंद गावडे, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार दयानंद सोपटे आणि राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचे पह्टो व्हायरल झाल्याने भाजपची कोंडी झाली आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.
अनलॉकचा फायदा उठवत गोव्यात चोरी छुपे रेव्ह पाटर्य़ा आयोजित केल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अशाच माहितीवरून शनिवारी मध्यरात्री हणजुणे येथील फिरंगी पन्नी या व्हिलावर धाड टाकली तेव्हा तेथील पार्टी पाहून पोलीसही हैराण झाले. तब्बल 23 जणे या पार्टीत चांगलेच ‘रंगले’ होते. पोलिसांनी 8 लाखांचे अमली पदार्थ आणि अडीच लाखांची रोकड तर जप्त केलीच, पण या पार्टीचा आयोजक कपिल झवेरी हा बॉलीवूड अभिनेता असल्याचे उघड झाले. पोलिसांनी झव्हेरीसह आणखी तीन विदेशी महिलांनाही अटक केली आहे.
झव्हेरी आणि भाजप नेते
कपिल झव्हेरी हा मुंबईच्या कांदिवलीत राहणारा असून त्याचे आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक भाजप नेत्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचे उघड झाले आहे. झव्हेरी आणि भाजपच्या या नेत्यांच्या भेटीचे पह्टोही व्हायरल झाल्याने भाजपची कोडी झाली आहे. कपिल झव्हेरीच्या फेसबुकवरील हे पह्टो आहेत. याच राजकीय संबंधाचा फायदा उठवत त्याने रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
सीबीआय चौकशी करा!
या प्रकरणानंतर गोव्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सरकारचा आशीर्वाद आणि ड्रग डिलरांशी भाजपचे लागेबांधे असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डने केला आहे, तर झव्हेरी याने रेव्ह पार्टीसाठीच भाजपच्या नेत्यांची भेट घेतली असा आरोप करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ‘ते’ पह्टोच आज पत्रकार परिषदेत सादर केले. रेव्ह पार्टीत विदेशी मुलींना आणण्यासाठी एक एजन्सी कार्यरत असून या एजन्सीचे सूत्रधार भाजपचे मंत्री आणि आमदार असल्याचेही चोडणकर म्हणाले. दरम्यान, हे प्रकरण तपासासाठी सीबीआय आणि ईडीकडे सोपवावे, अशी मागणी जितेश कामत यांनी केली आहे.


























































