गोव्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

कोविड संकटातही गोव्याच्या किनारी भागात आयोजित केल्या जात असलेल्या पाटर्य़ा गेल्या काही दिवसात चर्चेत असताना उत्तर गोव्यातील वागातोर येथील फिरंगीपानी व्हिला येथे काल रात्री आयोजित रेव्ह पार्टी क्राइम ब्रांचने उधळून लावत 9 लाखांच्या अमली पदार्थांसह 23 जणांना अटक केली आहे.

अनलॉक सुरू झाल्यापासून गोव्याच्या किनारी भागात गुपचूप पाटर्य़ा आयोजित केल्या जात आहेत. स्थानिकांकडून याबाबत काही तक्रारी करण्यात आल्या असून त्याचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पोलीस कारवाई करत नसल्याने हे सर्व घडत असल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत.

उत्तर गोव्यात वागातोर येथे काल रात्री गुपचूप रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. क्राइम ब्रांचला याची खबर मिळताच 3 पथके करून पार्टीवर धाड टाकून धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 9 लाख रुपयांचे कोकेन, एमडीएमए, एक्स्टासी गोळ्या, चरस आदी अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. क्राइम ब्रांचने याप्रकरणी तिघा विदेशी महिलांसह 23 जणांना अटक केली आहे.