भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे राज्यातील जैवविविधता धोक्यात

591

गोवा सरकारच्या उदासीनतेमुळे फक्त पट्टेरी वाघांची प्रजातीच नाही तर संपूर्ण जैवविविधताच धोक्यात असल्याचा आरोप शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत यांनी केला आहे. म्हादई अभयारण्यातील पट्टेरी वाघांची झालेली हत्या हा पुरावा आहे की जंगलातील दुर्मीळ प्रजातीच्या संरक्षणार्थ सरकार सपशेल अपयशी ठरले आहे अशी टीका कामत यांनी केली आहे.

विकासाच्या नावाखाली होणाऱ्या झाडांच्या कत्तलीमुळे नैसर्गिक वनस्पती नष्ट होत आहे. म्हादई नदीचे पाणी वळवल्यामुळे भविष्यात पाणी, वन,पशु, पक्षी, मासे, जीव-जंतू यांचे अस्तित्त्व देखील धोक्यात येणार आहे. जैवविविधता संरक्षण आणि संवर्धनासाठी कोणतेच धोरण सरकारकडे नाही याची खंत कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील गोळवली येथे विष प्रयोगाने चार वाघांचा मृत्यू झाला असूनन विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टिका करत गोव्यासाठी ही धोक्याची घंटा ठरेल, अशी भीती देखील व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या