गुजरात बंदीच्या अटीवर गोध्रा दंगलीच्या 17 दोषींना जामीन मंजूर

278
supreme_court

गुजरातमध्ये 2002 साली गोध्रा दंगलीतील 17 दोषींना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. सर्व दोषींना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु सगळ्यांना गुजरातमध्ये न जाण्याची अट घातली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात सर्व दोषींना अट घातली आहे. कुणीही गुजारमध्ये प्रवेश करू शकणार नाही. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत सर्व दोषी इंदूर आणि जबलपूर्मध्ये राहतील. तसेच सर्व दोषींना समाजसेवा करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

सर्व दोषींना वेगवेगळे ठेवण्यात येणार आहे. दोषींचा एक समूह जबलपूरमध्ये तर दुसरा समूह इंदूरमध्ये राहील. सर्व दोषींना समाजसेवा आणि धार्मिक काम करण्याची अट कोर्टाने ठेवली आहे. तसेच त्यांनी काय काम करावे हे निश्चित करण्यासाठी कोर्टाने अधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत. त्यांना  उपजिविकेसाठीही काम करता येणार आहे. या दरम्यान त्यांचे वागणे कसे असेल त्याचा अहवाल बनवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या