सोन्याच्या भावात पुन्हा घसरण, चांदीची चकमही पडली फिकी; जाणून घ्या नवीन दर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सणासुदीचा काळ जवळ येत असतानाच सोन्या-चांदीच्या भावांमध्ये बदल पाहायला मिळत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हिंदुस्थानी सराफा बाजारात सोन्याचा दर कमी झाल्याचे दिसले. तर दुसरीकडे चांदीचा भावातही घसरण झाली.

दिल्ली सराफा बाजारामध्ये सोमवारी सोन्याचा भाव 59 रुपयांनी कमी झाला. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 46 हजार 38 रुपयांवर आला. चांदीचा भावही आज 196 रुपयांनी कमी झाला आणि एक किलो चांदीचा दर 60 हजार 369 रुपयांवर पोहोचला.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्येही सोन्याच्या किंमती कमी होत आहे. सोमवारी सोन्याचा भाव 1 हजार 756 डॉलर प्रति औसवर स्थिरावला. तर चांदीचा दर 22.59 डॉलर प्रति औसवर कायम राहिला.

सराफा बाजारातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काळात सोन्याच्या किंमती आणखी खाली येऊ शकतात. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात शेअर मार्केट पडल्यानंतर लोकांनी सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅममागे 56200 रुपयांवर गेला होता. त्या तुलनेमध्ये सोन सध्या 10 हजारांनी स्वस्त मिळत आहे.

मिस कॉल देऊन जाणून घ्या भाव

दरम्यान, आता सोने-चांदीचा दर तुम्ही मिस कॉल देऊनही जाणून घेऊ शकता. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 या नंबरवर मिस कॉ देऊ शकतो. यानंतर काही वेळात एक एसएमएस तुम्हाला येईल आणि सोन्याचा दर माहिती होईल. तसेच सोन्याच्या भावातील चढउतार पाहण्यासाठी ww.ibja.co या ibjarates.com या वेबसाईटलाही भेट देऊ शकता.