सोन्याला सोन्याचे दिवस, चांदीने गाठला उच्चांक

सराफा बाजारात सोन्याला सोन्याचे दिवस आले आहेत. 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 1 लाख 6 हजार 111 रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीच्या दरातसुद्धा प्रचंड वाढ झाली असून चांदी प्रति किलो 1 लाख 24 हजार 536 रुपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचा भाव तेजीत आहे. 22 कॅरेट सोन्यानेही एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे.