सोनसाखळी चोर गजाआड, पादचारी महिलांचे मंगळसूत्र हिसकावून पळायचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीनिमित्त होणाऱया गर्दीचा गैरफायदा उचलण्यासाठी सोनसाखळी चोर सज्ज झाले होते. रविवारी एका चोराने माहीम परिसरात दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. पण माहीम पोलिसांनी शोधून काढत त्याला बेडय़ा ठोकल्या.

रविवारी सकाळी नऊच्या सुमारास माहीम परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून चोरटा पळाल्याची माहिती नियंत्रण कक्षातून पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार एपीआय अतुल आव्हाड, उपनिरीक्षक घुनावत व पथक घटनास्थळी दाखल झाले. तपास सुरू असताना तेथून 15 मिनिटांच्या अंतरावर पुन्हा सोनसाखळी चोरीची घटना झाल्याचा कॉल पोलिसांना आला. मग पोलीस त्या ठिकाणी गेले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मंगळसूत्र चोरणारा सराईत गुन्हेगार महेश कोळी असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानुसार महेश रेल्वे ट्रकमध्ये गेल्याची माहिती मिळाल्यानंतर आव्हाड व पथक त्या दिशेने गेले. पण पोलिसांना बघून तो पळत सुटला. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यावर त्याने खिशातला चाकू काढून आव्हाड यांच्यावर रोखला. तरीही पोलिसांनी शिताफीने महेशला पकडले.

शर्ट बदलून दोनदा स्नॅचिंग

महेशने सकाळी नऊच्या सुमारास पहिली चोरी केल्यानंतर एका नागरिकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा महेश भिंतीवरून उडी टाकून पळाला. त्याने लगेच दुसऱया रंगाचा शर्ट घालून दुसऱया पादचारी महिलेचे मंगळसूत्र त्याने चोरले. तासाभराच्या आत महेशने दोन स्नॅचिंग केल्य़ा