स्पीड किकिंग ऑनलाईन स्पर्धेत वडाळ्याच्या सर्वज्ञ महाकाळला सुवर्ण पदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी तायक्वांदो असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पीड किकिंग ऑनलाईन स्पर्धेत वडाळा येथे वास्तव्यास असलेल्या सर्वज्ञ राजीव महाकाळ याने 87 किलो वजनी गटात सुवर्ण पदकावर नाव कोरले. याप्रसंगी युवासेना व भारतीय विद्यार्थी सेना यांच्याकडून त्याला गौरवण्यात आले.

सचिव अजय व्हनोळे, माजी महिला शाखाप्रमुख धनश्री पवार, महिला उपशाखाप्रमुख नलिनी शेलार, प्रमोद लोखंडे, कुणाल वाल्मिकी, सर्वज्ञची आई प्राध्यापिक राधिका महाकाळ यांची उपस्थिती होती. या वेळी सर्वज्ञचे गुरु भास्कर करकेरा, प्रेमकुमार श्रेष्ठ, सिद्धेश घाग यांचाही सत्कार करण्यात आला.