दसऱ्याला दागिन्यांच्या खरेदीकडे ग्राहकांची पाठ

सोन्याच्या किंमती सवा लाखाच्या घरात गेल्याने सोने खरेदी करणे आता मध्यमवर्गीयांना परवडणारे नाही. त्यामुळे दसऱयाला सोन्याच्या दागिन्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. दरवर्षी दसऱयाला सोने खरेदी करतात, परंतु सोने खरेदीत या वर्षी 25 टक्के घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी दसऱयानिमित्त देशभरात 24 टन सोन्याच्या दागिन्यांची खरेदी झाली होती. ती या वर्षी 25 टक्के घसरणीसोबत केवळ 18 टन इतकी झाल्याचे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनने म्हटले आहे. वर्षभरात सोन्याच्या किंमती 48 टक्क्यांनी वाढल्या आहेत.