सोने पुन्हा वधारले, डिसेंबरपर्यंत आणखी वधारण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले काही दिवस सातत्याने उतरणारे सोने गुरुवारी पुन्हा वधारले. सोन्याच्या किमतीत 0.38 टक्क्यांनी वाढ होऊन ते प्रति तोळा 45942 रुपये झाले. चांदीच्या दरातही 0.10 टक्क्यांनी वाढ झाली. चांदीचा दर 58490 रुपये किलो इतका झाला.

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमती वाढल्याने देशांतर्गत बाजारपेठेतही सोन्याचे दर वाढले. सणासुदीचे दिवस असल्याने सोन्याचे दर आता घसरण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. डिसेंबरपर्यंत ते तोळ्याला 52 हजार रुपयांवर जाईल, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.