
सोने-चांदी आणि शेअर बाजारासाठी आजचा दिवस चढउताराचा राहिला. दिवाळीच्या सुट्टीनंतर मार्केट सुरू होताच गुंतवणूकदारांचा मूडपालट झाला आणि सेन्सेक्सने जबरदस्त उसळी घेतली. सेन्सेक्सने 85,290 चा 52 आठवडय़ांचा हाय टाईम गाठला. त्यानंतर त्याच्या उसळीला थोडा ब्रेक लागला आणि तो खाली आला. दुसरीकडे गगनाला भिडलेले सोने-चांदीचे भाव सलग तिसऱ्या दिवशी खालीच राहिले. गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात सहा हजार रुपयांची घट होऊन तो 1,27000 रुपये इतका खाली आला, तर चांदीचे दर सात हजारांनी घसरले. निफ्टी 50 ने इंट्रा-डे व्यवहारात 26,104 वर पोहोचला. दिवसाचा शेवट 25,891 वर झाला.




























































