
जागतिक अस्थिरतेच्या काळात आता सोन्या-चांदीची मागणी वाढत असल्याने त्यांचे दरही वाढत आहेत. त्यात आता चीनने चांदी निर्यातीवर निर्बंध लादल्याने जगभरात चांदीची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे चांदीने आधीचे सर्व उच्चांक मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आता लवकरच चांदी 3 लाखांचा टप्पा पार करेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. चांदीने 9 महिन्यात तब्बल 200 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
गेल्या वर्षात चांदीने सोन्यापेक्षा जास्त परतावा दिला असून या वर्षातही हाच ट्रेड कायम राहण्याची शक्यता आहे. एप्रिल २०२५ मध्ये सुमारे ९५,९१७ रुपये प्रति किलो असलेली चांदी आता २,८७,७०१ रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे. गेल्या नऊ महिन्यांत चांदीच्या किमतीत तब्बल २००% वाढ झाली आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर चांदी २,८७,७०१ रुपये प्रति किलोवर बंद झाली. गेल्याच आठवड्यात चांदीने २,९२,९०० रुपयांचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला होता. ही दरवाढ चांदीची वाढती मागणी आणि मर्यादित पुरवठा याचेच संकेत आहे.ही दरवाढीला जागतिक आणि औद्योगिक कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अनेक मोठमोठ्या ब्रोकरेज फर्म्सने चांदीच्या दराबाबतचे जुने अंदाज बदलले आहेत. आता अनेक फम्सने चांदीचे आपले लक्ष्य वाढवून ३,००,००० रुपये केले आहे. आता चांदी आता या टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. तसेच लवकरच हा टप्पाही लवकरच ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



























































