बुटात लपवून सोन्याची तस्करी; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

एअर इंडियाच्या विमानाने बँकॉकहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला कस्टमच्या हवाई गुप्तचर विभागाच्या पथकाने सोन्याची तस्करी करताना रंगेहाथ पकडले. प्रवाशाची अंगझडती घेतली असता त्याने बुटामध्ये सोने लपविल्याचे निष्पन्न झाले. मझहर मोईन खान असे त्या प्रवाशाचे नाव आहे. तो बँकॉकहून मुंबईत आला होता. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर त्याने ग्रीन चॅनेलदेखील पार केले. तो गेटच्या बाहेर पडणार तेवढय़ात एआययूच्या अधिकाऱयांनी खानला अडवले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या बुटात लपवून ठेवलेले सोन्याची दोन बिस्किटे सापडली. 56 लाख 12 हजार इतकी त्या सोन्याची किंमत असून ते जप्त करण्यात आले आहे.