
पाणलोटक्षेत्र तसेच कमांड एरियात झालेल्या पावसामुळे गेल्या तीन दिवसात मुळा धरणात 572 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले. यंदा पावसाळ्यातील मृग नक्षत्र कोरडे गेले आणि आद्रा नक्षत्राची सुरुवातदेखील शेतकऱयांच्या दृष्टीने निराशाजनक झाली. गेल्या आठवडय़ापासून घाटमाथ्यावरील पावसामुळे पिंपळगाव खांड ओव्हरफ्लो झाल्याने कोतुळकडून मुळा धरणात जेमतेम नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजता कोतुळकडून मुळा धरणात 625 क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरू होती. धरणाची पाणीपातळी 1772.35, तर धरणाचा पाणीसाठा 9 हजार 175 दशलक्ष घनफूट झाला आहे. मागील वर्षी 9 जुलैला मुळा धरणाच्या पाणीसाठय़ाची 8 हजार 255 दशलक्ष घनफूट नोंद होती. बुधवारी राहुरी, वांबोरी, कुक्कडवेढे, ताहराबाद, म्हैसगाव, कोळेवाडी, चिखलठाण या भागात पावसाने हजेरी लावली. बुधवारी राहुरी 34 मि.मी., मुळानगर 91, वांबोरी 11, कोतुळ 5 पावसाची नोंद झाली. आज सकाळी कोतुळकडून मुळा धरणाकडे 625 क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरू होती. सकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा 9 हजार 175 दशलक्ष घनफूट, तर पाण्याची पातळी 1772.35 फूट होती.

























































