धक्कादायक! मोटरमनशिवाय धावली मालगाडी, 70-80 च्या वेगाने जम्मूहून थेट पंजाबला पोहोचली

जम्मूच्या कठुआ रेल्वे स्थानकावर मालगाडी विना मोटरमन पंजाबच्या होशियारपूरला पोहोचली. जेव्हा ट्रेन तिथे थांबली तेव्हा रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. ट्रेनमध्ये चालक आणि गार्ड कोणीच नव्हते. सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना झालेली नाही.

जम्मूच्या कठुआ स्टेशनवर थांबलेली एक मालगाडी अचानक पठाणकोटजवळ विना मोटरमनशिवाय धावली. होशियारपूरच्या उची बस्सीजवळ ट्रेन थांबवण्यात आली. रेल्वेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 7.30 वाजता घडली. मालगाडीत दोन इंजिनही होते. विना चालक ट्रेन चालल्याची सूचना मिळाल्यानंतर संपूर्ण फिरोजपूर विभागात एकच गोंधळ उडाला आणि त्यानंतर जम्मूच्य़ा तवी स्थानकावर स्थानकांवर आपत्कालीन हूटर्स वाजू लागले. मालगाडीच्या पाठीमागे लागलीच अपघात निवारण गाडीही पाठवण्यात आली. यानंतर मालगाडी उची बस्सी येथे थांबवण्यात आली. ट्रेनचे एक इंजिन बंद पडले आणि दुसरे इंजिन चालू होते.मालगाडी कठुआ येथून होशियारपूरच्या उंची बस्सी स्थानकापर्यंत 70किमी ताशी वेगाने धावली. याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तारांबळ उडाली. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर अधिकाऱ्यांनी त्या मालगाडीला रोखण्यास यश मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी जम्मूच्या कठुआ रेल्वे स्थानकावर मालगाडी उभी होती आणि त्याचे इंजीन सुरु होते. दरम्यान लोको पायलट इंजीनमधून खाली उचरला आणि इतक्यात मालगाडी विना मोटरमनशिवाय धावली. अधिकाऱ्यांनी आधी पठाणकोट येथे रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे त्यांना यश आले नाही. खबरदारी म्हणून पठाणकोट रेल्वे स्थानकावर लाईन क्लीअर केली. त्यानंतर पठाणकोटला जाणाऱ्या सर्व ट्रेनवना रोखण्यात आले. त्यानंतर मालगाडी मुकेरिया स्थानकावर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथेही यश आले नाही. त्यानंतर उंची बस्सी येथे अधिकाऱ्यांना मालगाडी रोखण्यात यश आले.