ओटीपीसाठी आता स्मार्ट फोनची गरज नाही! गुगलचे नवीन फीचर येतेय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणतेही बॅंकिंग व्यवहार पूर्ण करताना ते ओटीपी अर्थात वन टाईम पासवर्डशिवाय पूर्ण होत नाही. यापुढे ओटीपीसाठी स्मार्टफोन जवळ ठेवण्याची गरज भासणार नाही. गुगल क्रोम-93 अपडेटसह फोनवरून पीसीवर एसएमएस वन टाइम पासवर्ड हस्तांतरण सक्षम करण्यासाठी एका वैशिष्टय़ावर काम करत आहे. क्रोम-93 वेबओटीपी इंटरफेसला समर्थन देईल. म्हणजेच वेब ब्राउझर वापरकर्त्याच्या फोनवर प्राप्त झालेला ओटीपी शोधेल, वाचेल आणि आपोआप एंटर करेल. त्यासाठी वापरकर्त्यांना अँड्रॉईड फोनची आवश्यकता असेल. हँडसेट आणि डेस्कटॉप ब्राउझर दोन्ही एकाच गुगल खात्यात साईन इन करणे आवश्यक असणार आहे. विशेष म्हणजे ते वापरत असलेली वेबसाईट वेबओटीपी तंत्रज्ञानाला समर्थन देणारी असावी. कारण हे फीचर सध्या क्रोमियम वेब इंजिनवर अवलंबून आहे.