गुगल सर्व्हर डाऊन, यूजर्सकडून तक्रारींचा पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुगल सर्च गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक ठप्प झाली. गुगल सर्च उघडल्यानंतर सर्व्हर एरर असे यूजर्सला दिसत होते. यामुळे सोशल मीडियावर हॅशटॅग गुगल डाऊन वेगाने ट्रेंड करण्यात आला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक यूजर्सनी स्क्रीन शॉट शेअर करत तक्रारींचा पाऊस पाडला. डाऊन डिटेक्टरनेही गुगल सर्च इंजिन उघडण्यास अडचणी येत असल्याच्या 3 हजारांहून अधिक तक्रारी आल्याचे म्हटले आहे.