डिजिटल पेमेंट करणाऱयांची संख्या जगभरात मोठी आहे. कोटय़वधी युजर्स गुगल पेच्या माध्यमातून पैशांची देवाण-घेवाण करतात. गुगल पे युजर्ससाठी मोठी बातमी आहे. या ऑप्लिकेशनचे स्टॅण्डअलोन व्हर्जन 4 जूनपासून बंद होणार आहे, अशी माहिती कंपनीने शनिवारी दिली. त्यामुळे देशातील ग्राहकांतही भीती निर्माण झाली आहे.
कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलेय, अमेरिकेत गुगल पे ऍप बंद केले जात आहे. या ऑप्लिकेशनचे स्टॅण्डअलोन व्हर्जन 4 जून 2024 पासून काम करणार नाही. त्यामुळे युजर्सने गुगल वॉलेटवर स्विच करावे. ऍपसोबत पियर-टू-पियर फिचरदेखील जाणार आहे. प्लॅटफॉर्मवर ऑफर्स आणि डील्स शोधता येणार नाही तसेच बॅलन्सदेखील मॅनेज करता येणार नाही. दरम्यान, हिंदुस्थान आणि सिंगापूरसारख्या देशांमध्ये गुगल पे ऍप सुरळीत सुरू राहील, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
– पेटीएमच्या साऊंड बॉक्समुळे दुकानदारांना प्रत्येककेळी मोबाइलकर आलेला मेसेज तपासण्याचा केळ काचतो. मात्र पेटीएम अडचणीत आल्यानंतर दुकानदारांसमोर प्रश्नचिन्ह होते. यातच गुगलने आता स्कतŠचा साऊंडपॉड आणण्याची तयारी केली आहे.