ग्राहकाने गुगल पिक्सेल- 3 साठी मागितला रिफंड, कंपनीने पाठवले 10 फोन

सामना ऑनलाईन । सॅन फ्रान्सिस्को

आताच्या घडीला गुगल ही मोठी कंपनी आहे. कंपनीच्या अनेक सेवा आहे. त्यापैकी एक म्हणजे कंपनीने बनवलेले ऍन्ड्रॉईड ही प्रणाली. कंपनीने त्यावर आधारित स्वतःचा पिक्सेल हा मोबाईलही लॉन्च केला आहे. त्याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या आहेत. गुगल पिक्सेलची एक आवृत्ती एका अमेरिकन नागरिकाला चांगलीच महागात पडली आहे. गुगल पिक्सेल – 3 हा मोबाईल चीतोह या तरुणाने 800 डॉलरला विकत घेतला. परंतु हा मोबाईल खराब निघाला. चीतोहने जेव्हा कंपनीनेकडे याचे पैस परत मागितले तेव्हा कंपनीने पैसे परत देण्याऐवजी पिक्सेलचेच 10 मोबाईल पाठवले.

गुगलच्या धोरणानुसार 80 डॉलर परत देऊ शकतात. आणि चीतोहने घेतलेला मोबाईल 900 डॉलरचा आहे. तर हे पैसे देण्याऐवजी त्यांनी पिक्सेलचे 10 मोबाईल त्याला पाठवून दिले आहे.