Google Pixel 4 – हात न लावता ऑपरेट होणार स्मार्टफोन

4692

यंदाच्या वर्षी जवळपास सर्वच कंपन्यांनी आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. अॅपल, वन प्लस, हुआवे आणि सॅमसंग गॅलक्सी यासारख्या आघाडीच्या कंपन्यांनी आपले स्मार्टफोन लॉन्च केले. आता गूगलही आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

15 ऑक्टोबरला Google Pixel 4 लॉन्च होणार आहे. परंतु तत्पूर्वीच या नवीन स्मार्टफोनचे फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. व्हायरल होत असणाऱ्या या फोटोमधून असे दिसून येते की Google Pixel 4 मध्ये रिअर पॅनेलवर बदल करण्यात आलेला आहे.

google

Google Pixel 4 ला दोन कॅमेरे दिसत आहेत. या फोनच्या तिन्ही बाजूला पातळ बेजल्सही दिसत आहेत. बाजूला सेल्फी कॅमेरा आणि इअरपीस देण्यात आलेले आहे. फिंगरप्रिंट लॉक आणि फेस अनलॉकही Google Pixel 4 देण्याची शक्यता आहे.

Google Pixel 4 चे वैशिष्ट्य म्हणजे हा स्मार्टफोन मोशन सेन्स टेक्नॉलॉजीसोबत येत आहे. यासाठी हे सेन्सर्स देण्यात आले आहे. या टेक्नॉलॉजीद्वारे फोनला हात न लावता हावभावावरून ऑपरेट करता येणार आहे. गूगलने काही दिवसांपूर्वी आपल्या ब्लॉगमधून याची माहिती दिली होती. यासाठी खास सेन्सर्स देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या