विधानभवनाच्या लॉबीत राडा, गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; मलाच मारण्यासाठी आले होते, आव्हाडांचा आरोप

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या संपणार आहे. पण त्यापूर्वी विधिमंडळात आज मोठा राडा झाला. विधिमंडळाच्या लॉबीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी बाचाबाची होऊन नंतर हाणामारी झाली. यात गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केल्याची माहिती आहे.

ही जर का परिस्थिती राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय? विधिमंडळातील राड्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला घेरले

विधिमंडळाच्या लॉबीत घडलेल्या या घटनेवरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला हे संपूर्ण महाराष्ट्राला समजलं पाहिजे- आव्हाड

पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला हे संपूर्ण महाराष्ट्राला समजलं पाहिजे. विधानसभेत जर तुम्ही गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचे जीव सुरक्षित नाहीत. मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या आहेत. कुत्रा, डुक्कर अजून काय काय लिहिलं आहे. भाषण करून बाहेर आलो होतो, मोकळी हवा खाण्यासाठी बाहेर गेलो होतो. हे सगळे मलाच मारण्यासाठी आले होते. विधानसभेत, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनात आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कुणीतरी मवाल्या सारखा येतो, आई बहिणींवरून शिव्या देतो त्याला पार्लमेंटरी शब्द करून टाका. अनपार्लमेंटरी शब्द वापरतात, ते पार्लमेंटरी करून टाका. सत्तेचा एवढा मुजोरपणा, सत्तेचा एवढा माज, असा संताप जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला. तर, गोपीचंद पडळकर यांनी या घटनेसंदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे.