
‘शरद पवार शत्रू नाहीत राजकीय विरोधक आहेत तेव्हा ज्येष्ठ नेत्या बद्दल या शब्दात भावना मांडणे योग्य नाही’, अशा शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बाबत काढलेल्या वक्तव्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी प्रतिक्रिया दिली.
सोलापूर शहरात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना बाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली. यावेळी देवेंद्र फडवणीस म्हणाले, ‘गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्न नाही. तरुण नेत्यांनी संयमाने वागावे. कठोर भावना मांडताना योग्य शब्द वापरावेत.’
गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी आक्रमक, केला जोरदार पलटवार
काय म्हणाले पडळकर?
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असे विधान गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून जोरदार पलटवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात ठिकठिकाणी निषेध सुरू झाला आहे. मंत्री धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.



























































