हिंदुस्थानी तरुणाची अंतराळात भरारी! गोपीचंद थोटाकुरा अंतराळात जाणारे पहिले हिंदुस्थानी बनणार

अंतराळात जाण्याचे लाखो-करोडो लोकांचे स्वप्न आहे, पण अनेकांचे स्वप्न हे स्वप्न राहते. परंतु पायलट गोपीचंद थोटाकुरांचे अंतराळात जाण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. गोपीचंद थोटाकुरा एक पर्यटक म्हणून अंतराळात जाणार आहेत. अंतराळात जाणारे ते पहिले हिंदुस्थानी पर्यटक ठरणार आहेत.

ब्लू ओरिजिन्सचे न्यू शेफर्ड-25 (एनएस-25) मिशनसाठी गोपीचंद थोटाकुरांची क्रू मेंबरसाठी निवड करण्यात आली आहे. थोटाकुरा अन्य पाच लोकांसोबत पृथ्वीच्या वायुमंडलने प्रवास करणार आहेत. गोपीचंद थोटाकुरा एक पायलट असून 31 जणांच्या टीममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीच्या दिवसात थोटाकुरांना  फ्लाइंगवरून जबरदस्त उत्साह होता. त्या प्रेमापोटीच त्यांनी विमान चालवणे शिकून घेतले. पर्यावरणाच्या दृष्टीने एनएस-25 मिशन एक नव्या युगाची सुरुवात करत आहे, असे ब्लू ओरिजिन्सने गोपीचंद यांच्याविषयी लिहिले आहे.