धक्कादायक… बालाकोट एअर स्ट्राइक होण्यापूर्वीच अर्णब गोस्वामीला माहिती मिळाली होती? कथित चॅट व्हायरल

सध्या सुरू असलेल्या टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीचा कथित गप्पांचा 500 पानी दस्तऐवज सोशल मीडियावर लीक झाल्याचे कळते आहे. लीक झालेल्या गप्पांमधून गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय व केंद्रातील सरकारच्या सदस्यांशी जवळीक, टीआरपींना त्यांच्या बाजूने हाताळण्याचे आणि भाजपा सरकारची मदत घेण्याचे प्रयत्न आणि बरेच काही यासंबंधीची माहिती देणारी माहिती समोर येणार आहे असे एका इंग्रजी वेबपोर्टलने म्हटले आहे.

आरोप आहे की, गोस्वामी आणि दासगुप्त राजकारणी, पत्रकार, न्यूज नेटवर्क आणि टीआरपी प्रणालीवर चर्चा करीत आहेत.

या गप्पांमध्ये गोस्वामींना काही संवेदनशील घटनांविषयी आणि बालाकोटच्या हल्ल्यांविषयीच्या चर्चा केल्याचे समजते आहे. गंभीर बाब म्हणजे बालाकोटमधील एअर स्ट्राईक होण्याच्या तीन दिवस आधीच गोस्वामी यांना माहिती असल्याचेही सांगितले जात आहे. यावर अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र ‘द लॉजिकल इंडियन‘ या वेबपोर्टलने या संदर्भातील वृत्तप्रसिद्ध केलेले आहे. तसेच सोशल मीडियावर यासंदर्भात फिरणारे मेसज देखील सोबत जोडलेले आहेत.
https://thelogicalindian.com/trending/goswami-balakot-air-strikes-26172

सोशल मीडियावर फिरणाऱ्या ‘लिक मेसेज’ला अजून दुजोरा मिळालेला नाही. मात्र हे चॅट मेसेज खरे असल्यास अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

टीआरपी प्रकरणात नुकतेच क्राइम ब्रँचने 3600 पानांचे अतिरिक्त पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यात 59 जणांच्या साक्षी, फॉरेन्सिक ऑडिटर पोलीस, संगणक तज्ञांचे पुराव्याबाबत अहवाल आहेत. त्यात 500 पानांचे अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉटस्अॅप संभाषण आहे. रजत शर्मा आणि ट्राय यांच्यात झालेले संभाषण, दासगुप्ताने बार्कचे दिलेले गोपनीय पत्र, त्या पत्रानंतर पीएमओकडून काही मदत होईल का अशी विचारणा केल्याचे त्या दोघांमधील संभाषण आहे.

तसेच अर्णबची दिल्लीवारी, चॅनल्समधील ‘कट’ आणि सरकार काय मदत करेल का असे त्या दोघांमधील संभाषण झाले होते. त्याचप्रमाणे कंगनाची सर्वात प्रथम घेतलेली मुलाखत आणि त्याला आलेला प्रतिसाद, त्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशला देव दूध पितात, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मागे ईडी, कर्नाटकातील फ्लोअर टेस्ट या बातम्या कशा पहिल्या दिल्या हे त्याबाबत अर्णबने दासगुप्तासोबत व्हॉटस् अॅपवर संभाषण केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या