‘सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है! शरद पवार यांच्या पक्षाचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान मोदी यांचा बुधवारी नाशिकमध्ये सभा होणार आहे. त्यानंतर ते कल्याणमध्ये जाणार आहेत. तसेच मुंबईत त्यांचा रोड शो देधील होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक येथील सभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समर्थक यशवंत गोसावी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ट्विटरवर पोस्ट करत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या एक्स अकाउंटवर केलल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नाशिकमधील मोदींच्या सभेपूर्वी @Yashwantgospeak यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जाणं म्हणजे कांद्याच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार सुरु आहे. भाजप सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असून मायबाप जनता आता मोदी सरकारला मतदानातून चांगलाच धडा शिकवणार, हे मात्र नक्की!, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

यशवंत गोसावी यांना अटक केल्याने प्रश्न सुटणार नाही मोदी साहेब कांद्यावर बोलावंच लागेल….अशी पोस्टही करण्यात आली आहे. मोदी याआधाही महाराष्ट्रात आले आहेत. मात्र, येथील शेतकरी, सर्वसामान्यांची समस्या आणि मराठा आरक्षण याबाबत बोलले नाहीत. यशवंत जाधव यांना ताब्यात घेत सरकारने शेतकऱ्यांची मुस्कटदाबी केली आहे. मोदींना कांद्याच्या प्रश्नावर बोलावेच लागेल, असेही शरद पवार यांच्या पक्षाने म्हटले आहे.