
सामना प्रतिनिधी । नगर
“ठोस प्रस्ताव नसेल तर मुख्यमंत्री असो व केंद्रीय मंत्री कोणीही चर्चेसाठी येऊ नका. चर्चा करण्यात अर्थ नाही, ठोस निर्णय घ्या आणि तसे लेखी कळवा. त्यानंतरच मी आंदोलनाबाबत निर्णय घेईल,” असे अण्णा हजारे यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
अण्णांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस असताना पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची राळेगणसिद्धीत येऊन अण्णांची चर्चा करण्याची तयारी होती. मात्र, अण्णांनी उलट निरोप देताना ठोस प्रस्ताव नसेल तर चर्चा करण्यात अर्थ नाही, असे या दोघांनाही बजावले. सरकारचे मंत्री म्हणतात की ९० टक्के मागण्या मान्य झाल्या. ते पूर्णपणे दिशाभूल करणारे असून ९० टक्के मागण्या मान्य झाल्या असत्या तर मी आंदोलन कशाला केले असते असा सवाल त्यांनी उपशित केला असून सरकार खोटं बोलत असल्याचे अण्णां सांगितले.


























































