Photo – पैसा दुप्पट करण्याची संधी, ‘या’ सरकारी योजनेमुळे व्हाल मालामाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी सर्वसामान्य नागरिकांपुढे चालून आली आहे. ही एक सरकारी स्कीम असल्याने पैसे बुडण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे या स्कीमबाबत जाणून घेऊया.

पोस्ट ऑफिसद्वारे ‘किसान विकास पत्र’ नावाची एक स्कीम चालवली जात असून यात तुम्ही एक लाखाचे दोन, दोनाचे चार किंवा पाचचे दहा लाख करू शकता.

‘किसान विकास पत्र’ या स्कीमअंतर्गत गुंतवणूकदारांना 6.9 टक्के व्याज मिळते. यात तुम्ही गुंतवणूक केली तर 124 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात.

गुंतवणूकदार 1000 रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करू शकतात. कमाल रकमेची यात मर्यादा नाही. यासाठी पोस्ट ऑफिसमधून तुम्हाला त्या रक्कमेचे सर्टिफिकीटही मिळेल.

आजच्या तारखेला समजा तुम्ही या स्कीममध्ये 5 लाख रुपये गुंतवले तर 6.9 टक्के व्याजदराने 124 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतील.

या स्कीममध्ये 10 वर्षांवरील कोणताही व्यक्ती गुंतवणूक करू शकतो. तसेच किमान तीन लोक एकत्र येऊनही या स्कीममध्ये पैसे गुंतवू शकतात.