देशभरातील 70 लाख सिमकार्ड बंद

सिमकार्डचा गैरवापर करून देशभरात डिजिटल फ्रॉड होत आहे. डिजिटल फ्रॉडला रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि टेलिकॉम विभागाने पावले उचलली असून फ्रॉड करणारे देशातील जवळपास 70 लाख संशयित सिमकार्ड बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती आर्थिक सेवेचे सचिव विवेक जोशी यांनी बुधवारी दिली आहे.

देशभरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण झपाटय़ाने वाढले आहेत. मोबाईलवरून वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून हे फ्रॉड केले जात आहेत. आधी शहरात होणाऱ्या सायबर गुह्यांचे लोन आता गावापर्यंत पसरले आहे. सायबर फ्रॉडमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून देशभरातील 70 लाख सिमकार्ड हे बंद करण्यात आले आहेत. सायबर गुन्हेगार रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे, असे सांगण्यात आले आहे. आर्थिक सायबर सुरक्षा संबंधित प्रश्नांवरील बैठक जानेवारी 2024 मध्ये होणार आहे.