
हिंदुस्थानी सैन्य दलातील जवानांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचे म्हटले जात आहे. सैन्य दलातील जवानांचे निवृत्तीचे वय 58 वर्षे करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सैन्य दलातील जवानांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. निवृत्तीचे वय आता 50, 54 किंवा 58 असू शकते असे म्हटले जात आहे. परंतु हा निर्णय संबंधित सैनिकांचा शारीरिक फिटनेस आणि श्रेणी यावर ठरणार आहे.




























































