सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचा 20 सप्टेंबर रोजी लाक्षणिक संप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
strike-01
प्रातिनिधिक फोटो

सरकारी-निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी 20 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारणार आहेत. कर्मचाऱ्यांना दिले जाणारे भत्ते हे सातव्या वेतन आयोगानुसार न देता ते अद्यापही जुन्याच पद्धतीने दिले जात आहेत. केंद्राप्रमाणे वाहतूक, शैक्षणिक, हॉस्टेल, शहरभत्ता देण्यात यावा, पाच दिवसांचा आठवडा व निवृत्तीचे वय 60 करा यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून हा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे.

राज्य सरकारी कर्मचारी 3 जुलै रोजी लक्षवेध दिन आंदोलन केले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 27 जून रोजी केलेल्या चर्चेच्या मागणीवरही निर्णय झाला नाही. सरकार दिलेली आश्वासने पाळत नाही. त्यामुळे कर्मचाऱयांमध्ये संताप असून 20 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप करण्याचा इशारा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला. यानंतरही सरकारने कर्मचाऱयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास निवडणुकीपूर्वी तीक्र आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे.