राज्यपालांनी महिलेच्या तोंडावरचा मास्क स्वतःच्या हाताने काढला, फोटो व्हायरल

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका महिलेच्या तोंडावरील मास्क स्वतःच्या हातांनी काढल्याचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पुण्यातील एका कार्यक्रमाचा असल्याची माहिती मिळत आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

त्या कार्यक्रमाप्रसंगी एका महिला सायकल पटूचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी फोटो काढत असताना, राज्यपालांनी त्या महिलेच्या तोंडावरचा मास्क चक्क स्वतःच्या हाताने काढला. हा फोटो सध्या जास्त व्हायरल होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या