धो धो पावसाच्या अभ्यासासाठी सरकार नेमणार टास्क फोर्स

193

सामना प्रतिनिधी, मुंबई

कमी दिवसात जास्त पाऊस पडून महापुरासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने सरकारही याबाबत गंभीर विचार करीत आहे. पावसाच्या बदलत्या वेळापत्रकाचा अभ्यास करण्यासाठी सरकार टास्क फोर्स नेमणार आहे. यात देशातील हवामानतज्ञांसोबतच आंतरराष्ट्रीय तज्ञांचा समावेश असणार आहे.

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत एक प्रेझेंटेशन करण्यात आले. जगभरात आपत्कालीन स्थितीत कोणत्या उपाययोजना केल्या जातात याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली.

लंडन, व्हेनीस, जिनिव्हाच्या धर्तीवर उपाययोजना
मुंबईसारख्या शहरात निर्माण होणाऱया पूरस्थितीला तोंड देण्यासाठी लंडन, जिनिव्हा, व्हेनीस यासारख्या शहरांत पूरस्थितीवर कोणत्या उपाययोजना केल्या जातात याचाही अभ्यास करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या