सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; केंद्राने जीपीएफचे व्याजदर 8 टक्के केले 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाइन । नवी दिल्ली

केंद्र सरकारनं जनरल प्रॉव्हिडंट फंडाचे (जीपीएफ) व्याजदर वाढवले आहेत. ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीसाठी जीपीएफचा व्याजदर 7.6 टक्क्यांहून 8 टक्के करण्यात आला. याचा फायदा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सरकारने छोट्या बचत योजनांवरही 0.40 टक्क्यांनी व्याज वाढवले आहे. जीपीएफ म्हणजेच जनरल प्रॉव्हिडंट फंड हे असे खाते आहे जे फक्त सरकारी कर्मचारीच उघडू शकतात. सरकारी कर्मचारी या खात्यात स्वतःच्या पगारातील ठरावीक रक्कम ठेवून सदस्य बनू शकतात.

या खात्यात जमा केलेली रक्कम सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळते. तसेच ही गुंतवलेली रक्कम प्राप्तिकर कायदा 80 सीअंतर्गत येत असल्याने करातूनही सूटही मिळते. जीपीएफवरील जमा रकमेवर 8 टक्के व्याज दिले जाते. जीपीएफ खात्यामध्ये तुम्हाला जीपीएफ अॅडवान्सची सुविधा मिळते. ती जनरल प्रॉव्हिडंट फंड सेव्हिंग खात्यांतर्गत दिली जाते . तसेच यावर व्याजमुक्त कर्जही मिळते. जीपीएफ खात्यातून काढण्यात आलेल्या रकमेवर कोणताही कर लागत नाही.