ग्रामपंचायत निवडणूक – परभणी जिल्ह्यात नऊ हजारांच्यावर उमेदवार रिंगणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ५६६ ग्रामपंचायतीमधील ४ हजार ३०० जागेसाठी तब्बल ९ हजारांच्यावर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे गावपातळीवरील राजकारण कमालीचे तापले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे ग्रामीण भागात वातावरण जोरदार तापले आहे. छोट्या-छोट्या गावातूनही जिल्हास्तरावर काम करणारे नेते मंडळी ठाण मांडूण बसली आहेत. त्यामुळे गावातील कार्यकत्र्यामध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. प्रभागातील कामाचा लेखा जोखा मांडून आपणच कसे कर्तबगार आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवार व पॅनल प्रमुखांकडून केला जात आहे. ऐरवी दुपारी व रात्रीच्यावेळी ओस पडणाऱ्या गावातील गल्लीrबोळातून आता गप्पाचे फड रंगतांना दिसत आहेत. कुठे कॉर्नर सभा तर कुठे भेटीसाठी काढण्यात आलेली रॅली ही गावातील चर्चेचा विषय ठरत आहे.

जिल्ह्यात एकूण ५६६ ग्रामपंचायतीची निवडणुक सुरु आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी देखील उमेदवारांची लगबग दिसून आली. ५६६ ग्रामपंचायतीमधील २ हजार ३९ प्रभागासाठी व चार हजार ३०० सदस्य निवडले जाणार आहेत. यात परभणी तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतीसाठी ७३६, सेूल तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीसाठी ५१९, जिंतूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतीसाठी ८०९, पाथरी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीसाठी ३७०, मानवत तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीसाठी ३३९, सोनपेठ तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीसाठी ३२९, गंगाखेड तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीसाठी २२२, पालम तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीसाठी ४३५ तर पूर्णा तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीसाठी ५४१ सदस्य निवडून येणार आहेत.

९ तालुक्यात ९ हजार ५ उमेदवार रिंगणात

अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ९ तालुक्यातील ३ हजार ३२४ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. त्यामुळे आता ४ हजार ३०० सदस्यांसाठी तब्बल ९ हजार ५ उमेदवारांचे अर्ज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात परभणी (१४३७), सेलू (९००), जिंतूर (१७०५), पाथरी (६७६), मानवत (७१४), सोनपेठ (६७३), गंगाखेड (१०८२), पालम (८३०) व पूर्णा (९८८) असे उमेदवार निवडणूक लढवित आहेत.