नातवाच्या रडण्याला कंटाळून आजोबांनी सुनेसह चिमुकल्याला संपवलं

यूपीच्या सीतापूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. नातवाच्या रडण्याला कंटाळून आजोबांनी सून आणि नातावर हल्ला केला. यामध्ये नातवाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली आहे.

ही घटना ताळगाव पोलीस ठाणे हद्दीतील देवरिया गावची आहे. शुक्रवारी सकाळी 10 महिन्याचे बाळ सतत रडत असल्याने आजोबा वैतागले होते. आवाज सहन झाला नाही म्हणून आजोबांनी नातू आयुषवर चाकूने हल्ला केला. यामध्ये आयुषचा जागीच मृत्यू झाला. सासऱ्यांनी अडवण्यासाठी आयुषची आई शिखा सामोरी गेली असता सासऱ्यांनी तिच्यावर देखील हल्ला केला. या हल्लायामध्ये शिखा गंभीर जखमी झाली आहे.

यानंतर शिखाचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक काय घडले पाहाण्यास आले. तेथील स्थानिकांनी आयुष आणि शिखाला उपचारासाठी रुग्णालयात  तातडीने दाखल करण्यात आले. मात्र  आयुषला डॉक्टरांनी मृत घोषित केले. उपचारांदरम्यान शिखाचाही मृत्यू झाला. एसपी चक्रेश मिश्रा यांनी  दिलेल्या माहितीनुसार,आई आणि मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तसेच आरोपीला अटक झाली असून तो मनोरुग्ण असल्याचे तपासात समोर आले आहे.