ग्रेसांचा उत्कट काव्यानुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नामवंत साहित्यिक आणि सिद्धहस्त कवी माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांच्यावरील ललितबंधांवर आधारित ‘कवि जातो तेव्हा’…हा नाटय़ अभिवाचनाचा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे.

जागर आणि गंगोत्री ग्रीनबिल्ड निर्मित या कार्यक्रमाचे दिग्दर्शन अमित वझे आणि लेखन डॉ. समीर कुलकर्णी यांनी केले आहे. या कार्यक्रमाविषयी अमित वझे सांगतात, कवि ग्रेसांवरील एक लेख ‘अनुभव’ या  दिवाळी अंकात डॉ. समीर कुलकर्णी यांनी 2012 साली लिहिला होता. त्या लेखावर आधारित हे संगीतमय नाटय़ अभिवाचन आहे. तसेच कवि ग्रेस यांच्यावर आधारित कविता आणि त्यांच्या गाण्यांशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. संगीत हा ग्रेसांच्या कवितांचा अंतर्भूत भाग आहे. त्यामुळे संगीत, नाटय़ आणि वाचन यांचा एकत्रित मिलाफ रसिकांना या अभिवाचनात अनुभवता येईल.

गजानन परांजपे, अपर्णा केळकर, अंजली मराठे, जयदिप वैद्य, निनाद सोलापूरकर आणि कौस्तुभ देशपांडे या कलाकारांचा सहभाग आहे.  कविता कशी समजून घ्यायची, कवितेतली सुबोधता, दुर्बोधता या सगळ्या मुद्यांवर हा कार्यक्रम बोलतो. एका दुर्बोध मानल्या गेलेल्या कविला समजून घ्यायचा प्रयत्न यामध्ये करण्यात आला आहे.

तीन ठिकाणी प्रयोग

रविंद्र नाटय़ मंदिर (मिनी थिएटर), प्रभादेवी, 18 ऑक्टोबर, रात्रौ 8.30 वाजता

प्रबोधनकार ठाकरे सभागृह (मिनी थिएटर), बोरिवली, 19 ऑक्टोबर, सायंकाळी 5 वाजता

डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह (मिनी थिएटर), ठाणे, 20 ऑक्टोबर, सायंकाळी 5 वाजता