
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून शाळेच्या चेअरमनने फी जमा न केल्याने विद्यार्थ्याच्या बहिणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यासोबतच आरोपीला अटक करून तुरूंगात पाठविण्यात आले आहे.
टीसी देण्याच्या बहाण्याने शाळेच्या चेअरमननी तिला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. इकोटेक -3 परिसरातील पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून आरोपी शाळेच्या चेअरमनला अटक केली. आरोपीला हजर केले असता त्याला तुरूंगात पाठविण्यात आले आहे.
या तरुणीचे म्हणणे आहे की तिचा भाऊ आठवी इयत्तेत शिक्षण घेत आहे. लॉकडाऊनमुळे फी जमा करता आली नाही, त्यानंतर शाळेच्या मालकांनी फी वसूल करण्यासाठी कुटुंबावर दबाव आणण्यास सुरुवात केली. 20 वर्षीच्या या तरुणीने अनेकदा शाळेच्या मालकाशी भेट घेऊन कुटुंबातील आर्थिक परिस्थिती सध्याच्या काळात अत्यंत खालावली असल्याचे सांगितले. त्याच वेळी, त्याने फी माफ करण्यासाठी शाळेच्या संबंधित व्यक्तीसोबत बोलण्यास सांगितले.
या तरुणीने पुढे पोलिसांना सांगितले की 4 सप्टेंबर रोजी पुन्हा तिच्या भावाच्या शाळेची फी माफ करण्यासाठी ती शाळेत गेली. त्यानंतर शाळेच्या प्रबंधक नीरज भाटी यांनी आपल्यासोबत जबरदस्ती केली. इतकेच नाही तर शाळेच्या चेअरमननी कुटुंबीयांना या घटनेविषयी सांगू नका असे सांगितले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. पण घाबरलेल्या पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना ही माहिती दिली.
नातेवाइकांनी ही घटना पोलिसांना कळवली. पोलिसांनी पीडितेला मेडिकलसाठी पाठवले आहे. डीसीपी महिला वृंदा शुक्ला म्हणाल्या की, आरोपींनी विद्यार्थिनीच्या बहिणीला टीसी देण्याच्या बहाण्याने बोलावले होते. त्याचवेळी आरोपी चेअरमननी जबरदस्ती केली. दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तुरूंगात पाठविण्यात आले आहे.


























































