
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने देश हळहळला. जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. कुणी गाण्यांच्या माध्यमातून तर कुणी आपल्या कलेच्या माध्यमातून लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली वाहत आहेत. एका तरुणीने रांगोळीच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली आहे. शिखा शर्मा असे या यूटय़ूब आर्टिस्टचे नाव आहे. तिने हाती तंबोरा धरलेल्या लतादीदी रांगोळीतून साकारल्या आहेत. शिखा शर्माने काही दिवसांपूर्वी व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्याला लाखो ह्य्tज मिळाले आहेत. युजर्स भरभरून प्रतिसाद देत आहेत.
























































