
लग्नाचे आमिष दाखवून मुलीची फसवणूक करणाऱ्या नवरदेवाला त्याच्या लग्नाच्या मंडपातून पोलिसांनी अटक केल्याची घटना घडली आहे. या घटनेने मंडपात नातेवाईकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे.
भवनेश्वर येथील बरगढ जिल्ह्यातील बेहेरापल्ली गावातील ही घटना आहे. अजित कुमार असे त्या नवरदेवातचे नाव आहे, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलीने अजितवर फसवणुकीचा आरोप केला आणि त्याच्याविरोधात भुवनेश्वर महिला पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली. तिने केलेल्या तक्रारीची दखल घेत भाटली आणि आयुक्तालय पोलीसांचे एक पथक लग्न मंडपात गेले आणि लग्नाच्या विधी सुरु असतानाच अजित कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतले.
ओडीशाच्या स्थानिय माहितीनुसार, पोलिसांनी नवरदेवाच्या ताब्यातून सोन्याची चेन, अंगठी आणि एक घड्याळ जप्त केले आहे. त्याला भुवनेश्वर घेऊन जाण्याआधी नववधूकडे सोपवण्यात आले आहे. नववधूच्या कुटुंबियांनी हुंड्यामध्ये एक कार खरेदी केली होती. पोलिसांनी नवरदेवाची मेडीकल केल्यानंतर त्याला न्यायालयात पाठवले आहे.

























































