अभिनेत्रीने शेअर केला बालपणीचा फोटो, तुम्ही ओळखलं का?

सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी आपल्या बालपणीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. या पोस्ट एकतर त्यांच्या फॅन्स पेजवर शेअर केले जातात किंवा ते स्वतः आपल्या चाहत्यांसाठी शेअर करतात. सेलिब्रिटींच्या थ्रोबॅक पोस्ट त्यांच्या चाहत्यांना खूप आवडतात.

नुकतेच एका बॉलिवूड अभिनेत्रीने आपला बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने सलवार सूट परिधान केलेला असून त्यात ती खूप क्यूट दिसत आहे. बालपणीच्या या फोटोमध्ये अभिनेत्रीने यलो कुर्ती आणि निळी सलवार परिधान केली आहे. त्यात तिने चप्पल घातली आहे आणि शाळेची बॅग खांद्यावर घेतली आहे.

तुम्ही ओळखलं का, कोण आहे ही अभिनेत्री?

अजूनही तुम्ही ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की नेमकी ही अभिनेत्री आहे तरी कोण? ‘रेहाना हे तेरे दिल में’ मधून अनेक चाहत्यांच्या मनात घर करणारी अभिनेत्री ‘दिया मिर्जा’ हिचा हा फोटो आहे. तिने ट्विटरवर आपला हा फोटो शेअर केला आहे.

दियाने फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, ‘माझ्या बालपणाला मी काय बोलू? ब्रह्मांडाची वेळ नेहमीच बरोबर असते, आपल्याला मात्र ते त्यावेळी माहित नसतं.’ दियाच्या या फोटोवर अभिनेत्री मलायका अरोरा हिने कमेंट करत लिहिलं आहे की, ‘हा फोटो खूप गोंडस आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या