
राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने हातभट्टीविरोधात धडक मोहिम सुरु केली आहे. गुहागर तालुक्यातील तीन ठिकाणी राज्य उत्पादन शुल्काचे पथक आणि भरारी पथकाने धाडी दारू जप्त केली आहे. या कारवाईत 2 लाख 15 हजार 700 रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
गुहागर तालुक्यातील तीन ठिकाणी राज्य उत्पादन शुल्काच्या विभागाने धाडी टाकल्या. या तीन ठिकाणी मिळून 400 लिटर गावठी दारु, 1 हजार लिटर रसायन, 1 चारचाकी वाहन असा एकूण 2 लाख 15 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक सागर ढोमकर यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक आणि अन्य पथकांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत भरारी पथकाचे निरिक्षक शरद जाधव यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

























































