गुजरातमध्ये एका मंत्र्याला कोरोनाची लागण, काँग्रेसचे वरिष्ठ नेते व्हेंटिलेटरवर

866

गुजरातमध्ये एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्री नितीन पटेल यांनी ही माहिती दिली आहे. तसेच काँग्रेसच्या एक वरिष्ठ नेत्यालाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

ज्या मंत्रीमहोदयांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांना अहमदाबादमधील एका रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याला कोरोनाची लागण झाली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सूरतचे भाजपचे आमदार आणि बनासकाठा जिल्ह्यातील एका काँग्रेस नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे.

मंगळवारी गुजरातमध्ये कोरोनाचे 778 रुग्ण आढळले अहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 37 हजार 636 वर पोहोचली आहे. मंगळवारी 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 1 हजार 797 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या