अहमदाबाद विमानतळावर 4 दहशतवाद्यांना अटक; इस्लामिक स्टेटशी संबंधित असल्याची सूत्रांची माहिती

प्रातिनिधिक छायाचित्र

गुजरात पोलिसांनी सोमवारी अहमदाबाद विमानतळावर इस्लामिक स्टेटच्या चार दहशतवाद्यांना अटक केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. चारही दहशतवादी श्रीलंकेचे नागरिक आहेत. ते आधी चेन्नईत पोहोचले आणि त्यानंतर अहमदाबादला दाखल झाले. ते अहमदाबाद विमानतळावर पाकिस्तानी हँडलरच्या संदेशाची वाट पाहत होते, अशी माहिती कळते आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.