गुजरातमध्ये घडल्या दोन हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना, वाचा सविस्तर…

1744

गुजरातमध्ये दोन हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना बनासकाठा जिल्ह्यातील भाभर तालुक्यातील मेरा गावात घडली. येथे एका मुलाचा मृतदेह प्रणाम करतानाच्या मुद्रेत आढळून आला, तर दुसरी घटना सुरतमधील सलाबतपुरा येथे घडली आहे. येथे एका जन्मदात्या बापाने 9 महिन्यांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या केली.

बनासकाठा जिल्ह्यातील भाभर तालुक्यातील मेरा गावात रस्त्याने जाताना गावातील लोकांना एका चिमुरड्याचा मृतदेह आढळून आला. प्रणाम करतानाच्या मुद्रेत हा मृतदेह रस्त्यावर बेवारस पडला होता. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा 45 डिग्री तापमानात एका चिमुकल्याला कोणीतरी रस्त्यावर सोडून गेले होते आणि त्याच अवस्थेत त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी चिमुरड्याला बेवारसपणे सोडून दिलेल्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चिमुरडीचा जमिनीवर आदळून खून

screenshot_2020-05-12-15-31-24-419_com-android-chrome_copy_700x450
दुसरी घटना सुरतमधील सलाबतपुरा येथे घडली आहे. येथे सोमवारी सकाळी एका नराधम बापाने आपल्याच 9 महिन्याच्या चिमुकलीचा खून केला. झोप मोडली म्हणून रागाच्या भरात नराधमाने चिमुकलीच्या गळ्यावर, छातीवर मारहाण केली आणि जमिनीवर आदळून तिचा खून केला. उवेश हसन शेख असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ‘दै. भास्कर’ने याबाबत वृत्त दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या